सावत्र आईसारखी वागणूक

मध्य अमेरिकेतील सर्वात लहान आणि दाट लोकसंख्या असलेल्या एल साल्वाडोरमध्ये भारतातील पर्यटकांना सावत्र आईसारखी वागणूक दिली जात आहे.

Oct 29,2023

नक्की कुठे आहे हा देश?

पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेला हा देश वायव्येला ग्वाटेमाला, ईशान्येला होंडुरास आणि दक्षिणेला पॅसिफिक महासागराने वेढलेला आहे. हे फोन्सेकाच्या आखातावर वसलेले आहे.

पर्यटकांची पसंती

फोन्सेकाच्या आखातावर वसलेल्या एल साल्वाडोरमध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, जिथे जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून नवीन कर वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

देशात जाण्यासाठी किती शुल्क लागते?

भारतासह 57 आफ्रिकन-आशियाई देशांच्या पासपोर्टवर येथे येणाऱ्या लोकांना 1000 डॉलर्स किंवा सुमारे 83,000 रुपयांपेक्षा जास्त शुल्क भरावे लागणार आहे.

आणखी कोणाला भरावा लागतो कर

हा कर फक्त भारतीयच नाही तर 50 हून अधिक आफ्रिकन आणि आशियाई देशांच्या पासपोर्टवर लावला जातो

ऑक्टोबरपासून नियम लागू

देशात येणाऱ्यांना 1,000 डॉलर फी भरावी लागेल, असे एल साल्वाडोरच्या बंदर प्राधिकरणाने ऑक्टोबरमध्ये आपल्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कशासाठी जमा केले जातेय शुल्क?

पर्यटकांकडून जमा झालेला निधी देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ सुधारण्यासाठी वापरला जाईल, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. (सर्व फोटो- reuters)

VIEW ALL

Read Next Story