अंबानी, अदानी, रतन टाटा..! तिघांची एकत्रित संपत्ती 'या' श्रीमंत महिलेपेक्षा कमी

Jul 29,2024


मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत यादीत यांचं स्थान आहे.


पण जगातील सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती या तिघांच्या एकत्र संपत्तीपेक्षाही खूप जास्त आहे.


आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात श्रीमंत महिला चीनच्या तांग वंशची महाराणी वू जेटियन हिचाबद्दल.


तांग घराण्याची सम्राज्ञी वू जेटियन हिने इ.स.सन 690 ते 705 पर्यंत चीनच्या भूमीवर राज्य केलं होतं.


तिच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर आजच्या तुलनेत तिच्याकडे आजच्या 16 ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती होती.


ती चीनची पहिली आणि एकमेव महिला सम्राट होती.


वू जेटियनचे वडील लाकूड व्यापारी होते आणि ती लहानपणापासूनच खूप हुशार होती.


वयाच्या 14 व्या वर्षी ती तांग कोर्टात सेक्रेटरी बनली होती. सम्राट ताईझोंगच्या मृत्यूनंतर ती एका बौद्ध मठात गेली.


पण, सम्राट गाओझॉन्गसोबतच्या तिच्या नातेसंबंधाने तिला पुन्हा राजवाड्यात आणलं. सम्राट गाओझोंग हा मृत सम्राटाचा मुलगा आणि उत्तराधिकारी होता.

VIEW ALL

Read Next Story