NASA

ताशी 5 हजार किमी वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येतोय विमानाहून मोठा खडक... NASA लक्ष ठेवून

Jet Propulsion Laboratory

अंतराळातील घटना पाहता ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण, 2011 QJ21 नावाचा एक लघुग्रह अतिप्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येतोय. Jet Propulsion Laboratory कडून त्यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

नासा लक्ष ठेवून

नासाही या घटनेकडे लक्ष ठेवून असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. ज्यामुळं या बाबतीतील गांभीर्य प्रकर्षानं समोर येतंय. पृथ्वीपासून हा लघुग्रह 19 ऑगस्टला अतिशय जवळ असणार आहे.

लघुग्रह

Near-Earth Object Studies (CNEOS) मधून मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या या लघुग्रहाचा वेग ताशी 54196 किमी इतका आहे.

लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ

QJ21 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ असेल तेव्हा हे अंतर 4,960,000 किमी इतकं असेल. आकडा पाहता हे अंतर मोठं असलं तरीही अंतराळ संशोधकांच्या दृष्टीनं के फारच कमी आहे.

लघुग्रहाचं आकारमान

पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या या लघुग्रहाचं आकारमान 140 फूट असून, एखाद्या विमानाहूनही तो मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. पृथ्वीच्या नजीक असणाऱ्या अपोलो ग्रुपमधील हा लघुग्रह असल्याचं सांगण्यात येतं.

लघुग्रहाचा धोका?

नासाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला पृथ्वीला या लघुग्रहाचा धोका नसला तरीही त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे. (सर्व प्रतिकात्मक छायाचित्र- फ्रिपिक)

VIEW ALL

Read Next Story