पृथ्वीवर कुठून आलं पाणी? भूगर्भात सापडलेल्या महाकाय समुद्रानं शास्त्रज्ञ अचंबित
असं म्हणतात की पृथ्वीच्या उदरातच तिच्यासंबंधीची अनेक गुपितं दडली आहेत. अशा या पृथ्वीसंदर्भातील एक रंजक माहिती नुकतीच समोर आली आहे.
संशोधकांना नुकताच पृथ्वीच्या पृष्ठापासून 700 किमी खोल अंतरावर सध्याच्या महासागरांहून तिप्पट मोठा जलसाठा सापडला आहे. ज्यामुळं पृथ्वीवर पाणी नेमकं आलं कुठून याबाबतचा खुलासा झाला.
अध्ययनातून समोर आलेल्या माहितीनुसार पृथ्वीवर उल्कापिंड आदळल्यामुळंच महासागर आणि पाण्याचे साठे तयार झाले.
इवान्स्टन, इलिनोइस में नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटीतील संशोधकांना यासंदर्भातील संशोधन करत असताना या जलसाठ्याची माहिती मिळाली.
रिंगवुडाइट नावाच्या एका पर्वताखाली नव्यानं सापडलेल्या या महासागरामुळं पृथ्वीवर पाण्याचे साठे नेमके कुठून आले यासंबंधीचीही माहिती समोर आली.
जमिनीच्या अंतर्गत भागात असणाऱ्या या जलसाठ्याचा आकार पृथ्वीवरील सातही महासागरांहून मोठा आहे.