अमेरिका-रशिया नव्हे तर 'या' देशाने बनवले AI Fighter Jet

Dec 30,2024


जगभरात प्रत्येक क्षेत्रांत विकासाच्या दृष्टीने बरेच बदल पाहायला मिळतात. यासोबतच फायटर जेट्सच्या जनरेशन्समध्ये देखील अनोखे बदल पाहायला मिळत आहेत.


आजच्या काळात जगभरातील जवळपास सर्वच देशांत स्पर्धा सुरू आहे. कित्येक देश फायटर जेट्सना आपल्या देशाच्या संरक्षणासाठी विकत घेतात.


अशातच अमेरिका आणि रशियासारख्या बलाढ्या देशांना मागे टाकत चीनने सहाव्या पिढीतील फायटर जेट म्हणजेच लढाऊ विमानाची यशस्वीरित्या चाचणी केली आहे.


अद्याप या फायटर जेटबद्दल आधिक माहिती समोर आली नाही. परंतु मिडीया रिपोर्टनुसार हे लढाऊ विमान जगातील सर्वात आधुनिक फायटर जेट आहे.


फायटर जेटला व्हाईट एमपरर (White Emperor) असे म्हटले जाते. मात्र, अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

AI नियंत्रित

हे फायटर जेट एआय (AI) नियंत्रणाच्या दृष्टीकोनातून बनवले गेले आहे. जेणेकरुन माणसाची मदत न घेता सुद्धा हे विमान काम करण्यासाठी सक्षम आहे.


मनुष्याच्या मदतीशिवाय काम करणे ही या फायटर जेटची विशेषता आहे. या विमानाचा ड्रोनसारखा सुद्धा वापर करु शकतो. आवश्यकतेनुसार यात पायलटसुद्धा बसू शकतो.


या फायटर जेटमध्ये हायपरसोनिक मिसाइल फायर करण्याची क्षमता आहे आणि शत्रूंना वेळीच नेस्तनाबूत करण्याइतपत हे सक्षम आहे.


रडार सिस्टमचा वापर करुन या फायटर जेटला थांबवणे जवळजवळ अशक्य आहे.

VIEW ALL

Read Next Story