कहर तेव्हा झाला, जेव्हा या महिलांना आजार असणाऱ्या सैनिकांशी बळजबरीनं शरीरसंबंध ठेवण्यास सांगण्यात आलं. लैंगिक आजार पसरण्यासाठीचं संशोधन त्यावेळी सुरु होतं.
जपानी सैन्यानं कैक वर्षे चीन, तैवानमधील नागरिकांवर अत्याचार केले. अनेकदा तर, कम्फर्ट वुमनचा वापर काही प्रयोग आणि चाचण्यांसाठी केला. महिलांवर गर्भधारणेसाठी दबाव टाकत त्यांच्या गर्भावरही काही प्रयोग करत त्यांच्या शरीरात व्हायरस किंवा बॅक्टेरिया सोडले जात होते.
तिथं प्रत्येक मुलीसाठी लहान खोल्या होत्या, या खोल्यांमध्ये सैनिक आळीपाळीनं येऊन मुलींवर अत्याचार करत आणि त्यांनी विरोध केल्यास त्यांना मारहाण करून विवस्त्र अवस्थेत गोठलेल्या नदीत फेकत
एका कम्फर्ट वुमननं दिलेल्या माहितीनुसार त्या 17 वर्षांच्या असताना सैनिकांनीच त्यांचं अपहरण केलं होतं. ज्यानंतर एका कारखान्यात त्यांना सोडलं गेलं.
किम हाक या महिलेनं जगासमोर येत कंम्फर्ट वूमन्सवर झालेला अत्याचार सर्वांसमक्ष आणला. त्यासुद्धा एक Comfert Woman होत्या. संपूर्ण जगातून याविरोधातील सूर आळवला गेला.
हे स्टेशन म्हणजे अशी ठिकाणी जिथं महिला त्यातही कौमार्य न गमावलेल्या मुलींना बंदी बनवून त्यांना Sex Slave केलं जात होतं. त्यावेळच्या दक्षिण कोरियावरही जपानचं अधिपत्य होतं. तिथंच 1910- 45 पर्यंत जपानकडून हे अत्याचार करण्यात आले.
दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमधून लाखो सैनिक लढत होते. पण, सैनिकांची शारीरिक गरज भागवणं लष्कराला शक्य नव्हतं. शेवटी रातोरात कंम्फर्ट स्टेशन सुरु करण्यात आले.