स्मार्टफोन अनेकांच्या आयुष्याचा महत्वपूर्ण भाग बनला आहे. अनेक लोकांची महत्वपूर्ण कामे स्मार्टफोनवर अवलंबून असतात. मनोरंजन आणि संवाद साधण्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर जगभरातील लोक मोठ्या प्रमाणात करत आहे.
McGill University ने केलेल्या रिसर्चनुसार World Of statistic ने स्मार्टफोन वापरण्याची सवय असलेल्या देशांची माहिती जाहीर केली आहे.
या यादीत प्रथम स्थान चीन या देशाच आहे. चीन देशातील नागरीकांना सर्वात जास्त स्मार्टफोन वापरण्याची सवय आहे. त्यानंतर सौदी अरेबिया देशाचा दूसरा क्रमांक लागतो.
3 क्रमांकावर मलेशिया, 4 क्रमांकावर ब्राजील आणि 5 व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे.
6 क्रमांकावर इरान, 7 क्रमांकावर कॅनडा, 8 क्रमांकावर तुक्री, 9 क्रमांकावर इजिप्त आणि 10 व्या क्रमांकावर नेपाल देश आहे.
11 क्रमांकावर इटली, 12 क्रमांकावर ऑस्ट्रोलिया, 13 क्रमांकावर इस्रायल , 14 क्रमांकावर सर्बिया आणि जापान या देशाचा 15 वा क्रमांक लागतो.
या यादीमध्ये भारताचा 17 वा क्रमांक लागतो. 16 व्या क्रमांकावर इंग्लंड, 18 व्या क्रमांकावर अमेरिका, 19 वा रोमानिया आणि 20 व्या क्रमांकावर नायजेरिया देशाचा क्रमांक लागतो.