जगातील सर्वात शक्तीशाली अन् श्रीमंत कंपनी... भारतीय अर्थव्यवस्थेच्या अडीचपट मोठा पसारा

ही आहे जगातील सर्वात महागडी कंपनी

जगातील सर्वात श्रीमंत किंवा मैल्यवान आणि शक्तीशाली कंपनी कोणती म्हटल्यास ब्लॅक रॉक कंपनीचं नाव घ्यावं लागेल.

ही कंपनी करते तरी काय?

पण ही ब्लॅक रॉक कंपनी नेमकं करते तरी काय आणि तिचा आर्थविषयक क्षेत्रावर किती प्रभाव आहे पाहूयात...

कंपनीचं वय 30 वर्षांपेक्षाही कमी

ब्लॅक रॉक कंपनीचं वय तसं 30 वर्षांपेक्षाही कमी आहे. मात्र ही कंपनी सध्या 9.42 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतची आहे. ही जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजर आहे.

जगभरात 70 कार्यालये

30 हून अधिक देशांमध्ये ब्लॅक रॉक कंपनीची 70 कार्यालये आहेत.

जगभरात प्रभाव

जगभरातील अर्थव्यवस्थांवर या कंपनीचा प्रभाव आहे.

अनेक कंपन्यांचं अधिग्रहण

स्थापनेपासून आतापर्यंत ब्लॅक रॉक कंपनीने अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं आहे. यामध्ये Merrill Lynch इनव्हेसमेंट मॅनेजमेंट आणि बार्कलेज ग्लोबल इनव्हेस्टर्स सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

3.3 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सचा विस्तार

ब्लॅक रॉक कंपनीने आयशेअर कंपनीचंही अधिग्रहण केलं. त्यामुळे त्यांना 3.3 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सचा विस्तार करता आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी कोण?

लॅरी फिंक हे ब्लॅक रॉक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

जागतिक धोरणांवर परिणाम

काहींच्या मते अर्थविषय क्षेत्राच्या पलीकडेही ब्लॅक रॉक कंपनीचा मोठा प्रभाव दिसून येतो. जागतिक स्तरावरील अर्थविषयक धोरणांवरही या कंपनीचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं.

फार मोठं नाव

जागतिक स्तरावरील अर्थविषय क्षेत्रात लॅरी फिंक हे फार मोठं नाव असून त्याची संपत्ती 1 बिलियन अमेरिकी डॉलर्सहून अधिक आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेहूनही मोठी कंपनी

भारतीय अर्थव्यवस्था 3.7 ट्रिलियन इतकी आहे. म्हणजेच ही कंपनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या अडीच पटीहून अधिक मूल्याची आहे.

VIEW ALL

Read Next Story