वैज्ञानिकांनी एक अभूतपूर्व संशोधन केले आहे. त्यांनी पृथ्वीच्या एका दुसऱ्या चंद्राची ओळख पटवलीय.
हा चंद्र 2024 पीटी-5 नावाच्या छोट्या एस्टेरॉइडने बनलाय. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत हा कैद आहे.
हा एस्टेरॉइड 29 सप्टेंबर 2024 ला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात काहीवेळ राहिला होता.
कॉम्प्लूटेन्से यूनिव्हर्सिटी ऑफ मेड्डिडच्या खगोलशास्त्रज्ञांनी दक्षिण आफ्रिकेच्या सदरलॅंडमध्ये एका शक्तीशाली दुर्बिणीतून याचा पत्ता शोधला.
चंद्राच्या तुलनेत हा खूप लहान आहे. पृथ्वीचा चंद्र 3474 व्यासाचा आहे. तर एस्टोरॉइडचा व्यास 11 मीटर इतका आहे. पृथ्वीचा चंद्र यापेक्षा 3 लाख पटीने मोठा आहे.
छोट्या आकारामुळे या एस्टेरॉइडचा शोध घेणं खूप आव्हानात्मक आहे. पण आता त्यांची ओळख पटवण्याची तांत्रिक क्षमता निर्माण झाल्याचे एमआयटीचे खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड बिजनेल सांगतात.
2024 पीटी5 अर्जुन एस्टेरॉइडचा एक भाग आहे.हा सुर्याच्या चारही बाजुने आणि पृथ्वीच्या समान कक्षेत फिरतो.
यातील काही एस्टेरॉइड पृथ्वीपासून साधारण 45 लाख किमी अंतरावरील बिंदूपर्यंत पोहोचतात.
यांचा स्पीड 3500 किमी प्रति तासपेक्षाही कमी असतो. जो खूपच स्लो आहे.
नासाच्या होरायजन्स सिस्टिमने दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर 2024 ला एस्टेरॉइड 2024 पीटी 5 आपल्या पृथ्वीचा चंद्र बनला.
25 नोव्हेंबर 2024 ला हा पृथ्वीच्या कक्षेतून निघून जाईल.
मिनी मूनचा अभ्यास करणारे एक्सपर्ट कार्लोस डेला फुएंत मार्कोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचे एस्टेरॉइड पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करणार नाही.