ऑफिस अवर्सनंतर बिनधास्त Cut करता येणार Boss चा कॉल! नवा कायदा आजपासून लागू

काम नाकारण्याचा अधिकार

कामाचे तास संपल्यानंतर ऑफिससंदर्भातील कोणतंही काम नाकारण्याचा अधिकार देणारा कायदा आजपासून म्हणजेच 26 ऑगस्टपासून मंजूर झाला आहे.

कायद्याचं नाव काय?

हा कायदा ऑस्ट्रेलियामध्ये लागू झाला आहे. या कायद्याला ऑस्ट्रेलियाने 'राइट टू डिसकनेक्ट' असं नाव दिलं आहे.

फेब्रुवारीमध्येच संमत

खरं तर या संदर्भातील विधेयक फेब्रुवारी महिन्यामध्येच ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये संमत झालं होतं. 'फोर्ब्स ऑस्ट्रेलिया'ने दिलेल्या माहितीनुसार 26 ऑगस्टपासून हा कायदा देशभरात लागू होणार आहे.

खासगी आणि कॉर्परेट आयुष्य वेगळं

कर्मचाऱ्यांच्या हिताचा आणि संरक्षणाचा विचार करुन हा कायदा लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे खासगी आणि कॉर्परेट आयुष्यामध्ये अंतर ठेवता येईल असं सांगण्यात आलं आहे.

अनेक अपवादांचाही समावेश

मात्र या कायद्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये काही ठराविक परिस्थितीमध्ये कायदा लागू होणार नसल्याचं म्हटलं आहे. कंत्राटी कर्मचारी किंवा अतिरिक्त तास काम केल्याबद्दल पैसे दिले जात असतील तर अशावेळी हा कायदा लागू होणार नाही.

...तर कायदा लागू होणार नाही

अतिरिक्त कामाचे अतिरिक्त पैसे मिळत नसतील तर हा कायदा लागू होईल. मात्र ओव्हर टाइमचे पैसे किंवा अधिक वेळ काम केल्याचे पैसे दिले जात असतील तर हा कायदा त्या ठिकाणी लागू होणार नाही.

हा पहिलाच देश नाही

विशेष म्हणजे हा असा कायदा लागू करणारा ऑस्ट्रेलिया काही पहिला देश नाही. यापूर्वी फ्रान्स, जर्मनीबरोबरच युरोपीयन महासंघामधील सदस्य असलेल्या अनेक देशांमध्ये असा कायदा लागू करण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story