जगभरात दर दिवशी लाखो लोक रेल्वेनं प्रवास करतात. पण, तुम्हाला माहितीये का की या 'रेल्वे' शब्दाचा नेमका अर्थ आहे तरी काय?
New World Encyclopedia नुसार रेल्वे शब्दाची उत्पत्ती औद्योगिक क्रांतीदरम्यान झाली. गतकाळात ब्रिटनमध्ये अवजड सामानाच्या मालवाहतुकीसाठी रेल्वेची सुरुवात करण्यात आली होती.
18 व्या शतकामध्ये कोळशाच्या खाणीतून सामानाची ने- आण करण्यासाठी रुळावर चालणाऱ्या वॅगनवेजचा वापर केला जात होता.
सुरुवातीला रेल्वे रुळ लाकडी असत. पण, कालांतराने ते लोखंडाचे बनवून घेण्यात आले. 1804 मध्ये रिचर्ड ट्रेविथिक यांनी वाफेच्या इंजिनावर चालणारी ट्रेन बनवली. दक्षिण वेल्समध्ये ही रेल्वे कार्यरत होती.
1812मध्ये जॉन ब्लेकिन्सोप यांनी यशस्वीरित्या पहिलं रेल्वे लोकोमोटीव्ह डिझाईन तयार केलं.
पाहता पाहता याच डिझाईनमुळं रेल्वे शब्दाचा वापक अधिक व्यापक झाला आणि ब्रिटनसह युरोप आणि जगभरात हा शब्द प्रचलित झाला.