काकडी खरेदी करताना 'या' टिप्स करा फॉलो, फ्रेश आणि निघणार नाही कडू

काकडी खाल्यानं रहाल हायड्रेट

काकडीचे सेवन केल्यानं आपलं शरिर हे हायड्रेटेड राहतं.

काकडी विकत घेतल्यानंतर अनेकांच्या असतात या तक्रार

काकडी विकत घेतल्यानंतर बऱ्याचवेळा ती कडू निघते किंवा मग आतुन सुकलेली निघते.

काकडी विकत घेताणा काय काळजी घ्यायला हवी?

काकडी हिरव्या रंगाची दिसायला हवी असून कुठेतरी ती थोडी पिवळी असायला हवी.

कधीच खरेदी करू नका अशी काकडी

काकडी ही मऊ नसायला हवी. मऊ असलेल्या काकडीत खूप जास्त प्रमाणात बिया असण्याची शक्यता असते.

कसं कळेल काकडी मऊ आहे की नाही

काकडी खरेदी करताना हातानं ती दाबून पाहा. म्हणजे पाण्यात खराब होत असलेली काकडी असेल तर तुम्हाला लगेच कळेल.

काकडीची साइज कशी हवी?

बाजारात हायब्रिड आणि देशी अशा दोन्ही प्रकारच्या काकड्या असतात. हायब्रीड काकडी लांब आणि जाड असते. तर देशी छोटी आणि बारीक असते. त्यामुळे देशी काकडी विकत घेण्यास प्राधान्य दया.

छोटी काकडी नसते कडू

तुम्ही जर देशी काकडी खरेदी करत असाल तर ती कडू निघण्याची शक्यता कमी असते. इतकंच नाही तर त्यात बिया देखील खूप कमी असतात.

पाण्यात ठेवलेली काकडी कधीच खरेदी करू नका

पाण्यात ठेवलेली काकडी कधीच खरेदी करू नका त्यात जास्त प्रमाणात पाणी असते आणि त्याची चव देखील खूप खराब असते.

खराब झालेली किंवा आधीच कापलेली काकडी खरेदी करू शकता का?

आधीच कापलेली काकडी खरेदी करू नका. याशिवाय ज्या काकडीवर पांढरी लाइन दिसत असेल ती खाण्यास कडू लागते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story