अनेक देशांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. ज्यावर आपण कधीच विश्वास ठेवू शकत नाही.
असाच एक देश आहे, जिथे रात्री 10 नंतर लोक फ्लश करु शकत नाहीत.
स्वित्झर्लंडमध्ये रात्री 10 वाजल्यानंतर टॉयलेटमध्ये फ्लश न करण्याची परंपरा आहे. असा नियम अपार्टमेंटमध्ये करण्यात आला आहे.
कारण स्वित्झर्लंडमध्ये रात्री 10 वाजल्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत शांतता वेळ मानली जाते.
त्यामुळे तेथील लोकांना असे वाटते की यावेळेत फ्लशिंगमुळे जास्त आवाज येतो. सामुदायिक शांतता राखणे हा या परंपरेचा मुख्य उद्देश आहे.
परंतु, स्वित्झर्लंडमध्ये असा कोणताही सरकारी नियम नाहीये.