आश्चर्यकारक रहस्य

'या' गावात प्रत्येकाला एकच किडनी; जाणून घ्या यामागचं धक्कादायक रहस्य

नेपाळची खरी ओळख

नेपाळची खरी ओळख ही तिथं असणारी मंदिरं आणि निसर्गसौंदर्यामुळं आहे. शिवाय इथल्या नागरिकांकडून मिळणारं आदरातिथ्यही तिथं जाणाऱ्या पर्यटकांच्या मनाचा ठाव घेतं.

गोष्ट एका गावाची

अशा या देशात म्हणे एक असं गाव आहे जे किडनी व्हॅली म्हणून ओळखलं जातं.

पेचात पडलात ना?

तुम्हीही पेचात पडलात ना? हे असं नाव कुणी देतं का? जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण, या गावातील बहुतांश नागरिकांना एकच किडनी आहे.

किडनी व्हॅली

नागरिकांच्या शरीरात असणाऱ्या या वेगळेपणामुळं या गावाला किडनी व्हॅली असं नाव पडलं आहे. या गावाचं खरं नाव आहे होकसे.

सत्य उघड

इथल्या नागरिकांना जन्मत:च एक किडनी नसते. तर, इथं राहणारी अनेक कुटुंब गरीब आहेत. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी आणि इतर खर्चांसाठी पैसे मिळावेत यासाठी ते नाईलाजानं किडनी विकतात.

फसवणूक

असं म्हटलं जातं की इथं बऱ्याच गावकऱ्यांना फसवून त्यांची किडनी काढली जाते. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांचा हा भाबडा संघर्ष अचानकच डोळ्यात पाणी आणतो.

अवयवांची तस्करी

इथं ही मंडळी अवघ्या 2 हजार रुपयांना किडनी विकली जाते. इतकंच नव्हे तर या गावात मानवी शरीराच्या अवयवांची तस्करीही मोठ्या प्रमाणात चालते.

वास्तव

निसर्गाच्या कुशीत, तुमच्याआमच्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या गावाचं हे वास्तव अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकवतं.

VIEW ALL

Read Next Story