Know the Right way to pour wine and beer

बिअर, वाईन ग्लासात वेगवेगळ्या पद्धतींनी का ओततात, Pouring ची योग्य पद्धत माहितीये? बिअर, वाईन, व्हिस्की, रम, वोडका, जिन या आणि अशा अनेक प्रकारच्या मद्यांचं सेवन जगभरातील तळीराम करतात.

मद्य ग्लासात ओतण्याची पद्धत

प्रत्येकाच्या आवडीनुसार मद्य बदलतं आणि मद्य बदलतं तसं ते पिण्याची, अगदी ते ग्लासात ओतण्याचीही पद्धत बदलते.

तिला येणारा फेस कमी होतो

तुम्हाला माहितीये का, बिअर सहसा ग्लास वाकडा करून त्यात ओतली जाते. ज्यामुळं तिला येणारा फेस कमी होतो.

फसफसणारी बिअर

उभ्या ग्लासात भसाभस बिअर ओतल्यास ती जास्त फसफसते. पण, अनेकांना ही फसफसणारी बिअरही आवडते.

वाईन ओतू शकता

वाईनचं म्हणाल तर, ह एक लक्झरी ड्रींक आहे. किंबहुना वाईन ओततानाही अनेकजण ग्लास हातात घेऊन तो वाकडा करताना दिसतात.

वाईनची बाटली

यासाठी वाईनची बाटली मागच्या बाजूला पकडा आणि ती ग्लासमध्ये ओता, थांबताना एका क्षणात वाईनची धार थांबला आणि बॉटल वर उचला. एका चांगला बेस असणाऱ्या सुरेखशा वाईन ग्लासला न उचलता तुम्ही त्याच वाईन ओतू शकता.

स्पार्कल होणं...

स्पार्कलिंग वाईनच्या बाबतीतही अनेकजण अशीच चूक करतात. स्पार्कल होणं, अर्थात फसफसणं हाच या वाईनचा गुण आहे.

स्पार्कलिंग वाईन

त्यामुळे की ग्लासात ओतत असताना तो चुकुनही वाकडा करू नका. ग्लास उभा ठेवून त्यात ही स्पार्कलिंग वाईन अशा पद्धतीनं ओता की त्यातील लहान बुडबुडे जास्त प्रमाणात येतील.

वाईनचा ग्लास

काही क्षण या वाईनचा ग्लास तसाच सोडा आणि त्यातील फेस शांत झाल्यानंतर एक घोट घ्या.

मद्य कोणतंही असो...

मद्य कोणतंही असो, त्याच्या गुणधर्मांनुसारच त्याचं सेवन होणं अपेक्षित असतं. इतकंच काय तर ते ग्लासात ओतण्याची पद्धतही वेगवेगळी असते. हो, पण मद्याचं अतिसेवन आरोग्यासाठी घातक आहे हे मात्र विसरून चालणार नाही.

VIEW ALL

Read Next Story