बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आत्तापर्यंत आले आहेत जे एकाच वेळी एकाच दिवशी क्लॅश झाले आहेत.

जसे की यावर्षी OMG 2 आणि गदर 2 हे दोन चित्रपट एकाच दिवशी म्हणजे 11 ऑगस्टला प्रदर्शित झाले होते.

यावेळी दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस चांगली कमाई केली होती. परंतु त्यातही गदर 2 हा चित्रपट सुपरहीट ठरला.

यावर्षी 21 जूलै 2023 रोजी 'ओपनहायमर' आणि 'बार्बी' हे दोन्ही एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. ज्यांची बरीच चर्चाही रंगलेली होती.

या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली होती. यावेळी मार्गोट रॉबी आणि किलियन मर्फी यांनी 'व्हरायटी'ला दिलेल्या गप्पांमधून काही रंजक खुलासे केले.

यावेळी गप्पांच्या ओघात यावेळी मार्गोट रॉबी हिनं किलियन मर्फीला सांगितले की, ''तुमच्या निर्मात्यांनी पैंकी एका निर्मात्यानं, चक रोवेननं मला बोलावलं. आम्ही याआधी एकमेकांसोबत काम केले होते. तेव्हा तो मला म्हणाला की, 'मला वाटतंय की तुम्ही तुमच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलावी.''

तेव्हा मी त्याला म्हणाले की, 'तुम्ही तुमची तारीख पुढे करा. तुम्हाला जर का आमची भीती वाटत असेल तर तुम्ही तारीख पुढे करावी.'

तेव्हा तो म्हणाला की, 'नाही आम्ही आमची तारीख पुढे करणार नाही. मला असं वाटतंय की हे तुमच्यासाठी योग्य राहील.' तेव्हा मी त्याला म्हणाले, आम्ही करणार नाही. मला असं वाटतंय आपली जोडी चांगली राहील. ओपनहायमर आणि बार्बी'. यावरून किलियन म्हणाला, 'एकदी योग्य केलं.'

VIEW ALL

Read Next Story