भीषण

कोरोनाहूनही भीषण; 'या' कारणामुळं मिनिटाला दोन मृत्यू

मृत्यू ओढावला

कोरोनाच्या अनेक लाटांमध्ये जगभरातून बऱ्याचजणांचा मृत्यू ओढावला. ज्यावेळी या महामारीचा सर्वात वाईत प्रहार सुरु होता तेव्हा तर अनेक देशांना Lockdown चाही निर्णय घ्यावा लागला

कोरोना नियंत्रणात

साधारण दोन वर्षांनंतर हे सावट कुठे कमी झालं आणि कोरोना नियंत्रणात आला. असं असलं तरीही जागतिक स्तरावर होणाऱ्या मृत्यूंमागचं एक भयंकर कारण नुकतंच समोर आलं.

रस्ते अपघातांमध्ये होणारी हानी

संयुक्त राष्ट्रांकडून याबाबतचा इशारा देण्यात आला असून, त्यांच्या माहितीनुसार रस्ते अपघातांमध्ये होणारी हानी आणि त्याचा अर्थव्यवस्थांवर होणारा परिणाम हे सारंकाही कोरोनाइतकंच गंभीर असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

दर मिनिटाला दोन मृत्यू

एका अहवालानुसार जगात दरवर्षी साधाण 10.3 लाख अपघाती मृत्यू होतात. त्याप्रमाणं दर मिनिटाला दोन मृत्यू होतात. मृतांमध्ये अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचा आकडा मोठा आहे.

अपघाती मृत्यू

भारतावर लक्ष केंद्रीत करायचं झाल्यास इथं दरवर्षी जवळपास 5 लाख अपघात होतात ज्यापैकी 2 लाख नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. ही आकडेवारी पाहता परिस्थिती नेमकी किती भीषण आहे याचा अंदाज येतो.

आकडेवारी

दिवसाच्या अनुषंगानं आकडेवारी पाहायली झाल्यास देशात दर दिवशी 1130 अपघात आणि 422 मृत्यू होतात. तर, तासाला 46 अपघात आणि 18 मृत्यू ओढावतात.

अपघातांची कारणं

भारतातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची कारणंही तितकीच महत्त्वाची असून, त्यात अती वेग, वाईट वाहन चालन पद्धत, हवामन बदल, मद्यपान करून वाहन चालवणे, वाहनात बिघाड अशा कारणांचा समावेश आहे.

रस्त्यांची दूरवस्था

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक रस्ते सुरक्षा परिषदेचे प्रमुख जीन टोड्ट यांच्या माहितीनुसार या कारणांसोबतच रस्त्यांची दूरवस्था पाहता त्यांच्याकडेही लक्ष दिलं जाणं अत्यंत गरजेचं आहे.

सर्वाधिक अपघात

भारतामध्ये सर्वाधिक अपघात होणाऱ्या वाहनांमध्ये बस, ऑटोरिक्षा, बैलगाडी- हातगाडी, ट्रक, कार, दुचाकी यांचा समावेश आहे. तर, यामध्ये 12.2 टक्के पादचाऱ्यांचाही समावेश आहे. परिणामी कोरोनाप्रमाणं रस्ते अपघातांबाबतही एकत्र येऊन काम करण्याचं गरज असल्याची बाब संयुक्त राष्ट्रांकडून अधोरेखित केली जात आहे.

VIEW ALL

Read Next Story