NASA नं टीपला अवकाशातील ताऱ्यांनी तयार केलेला पक्षी; पाहा भारावणारे PHOTOS
NASA च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप अर्थात जगातील काही दुर्मिळ आणि अतिमहत्त्वाच्या दुर्बिणीपैकी एक असणाऱ्या दुर्बिणीनं एक अद्वितीय दृश्य टीपलं आहे
NGC 346 मिड इन्फ्रारेड लाईटमध्ये नासानं ताऱ्यांपासून तयार होणारी एक अशी आकृती टीपली आहे जी एकटक पाहिल्यास आपल्याला एखाद्या पक्ष्यासारखी दिसते.
नासानं इंग्रजीत याचा उल्लेख raven असा केला असून, त्याचं भाषांतर होतं कावळा. या फोटोच्या खालचा भाग वर्तुळाकार दिसत असून एखाद्या होडीसारखाही आकार तयार करतो.
फोटोमध्ये दिसणाऱ्या प्रकाशामधील लालसर प्रकाश तप्त धुलिकणांकडे खुणावतो. इथं अनेक सूक्ष्म ताऱ्यांचं अस्तित्वं आपल्याला पाहायला मिळतं.
फोटोमध्ये उजव्या कोपऱ्यावर दिसणारा आकार एखाद्या शेपटीसारखा दिसतो. तर त्याच्याच वरच्या दिशेला व्यवस्थित पाहिल्या एक पंखही दिसतो.
नासाकडून दाखवण्यात आलेलं हे दृश्य कमाल आहे ना? (छाया सौजन्य- नासा/ इन्स्टाग्राम)