अवकाशात सुरु असणाऱ्या कैक क्रिया प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पृथ्वीवर परिणाम करत असतात, त्यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी.
जाणून आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीवरील वाहत्या पाण्याने चक्क संपूर्ण पृथ्वीला हादरा दिला असून, शास्त्रीय भाषेतच म्हणावं तर, पाण्यामुळं गेल्या दोन दशकांमध्ये पृथ्वीचा अक्ष 31.5 इंच इतका हलला आहे.
मानवाकडून होणऱ्या भूगर्भजलाच्या वापरामुळं पृथ्वीच्या अक्षावरील भार वाढत असून त्याचं स्थान बदलताना दिसत आहे. भूजलाच्या उपसा प्रक्रियेमुळं जागतिक सागरी स्तरातही 0.24 इंचांची वाढ झाली आहे.
पृथ्वीच्या उदरातून काढलं जाणारं पाणी समुद्राला जाऊन मिळतं आणि त्याचाच परिणाम हवामान बदलांवर होताना दिसतो. भूजलाच्या हालचालीचा थेट परिणाम पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिक्रमणावर होताना दिसतो. की विऑन या शास्त्रज्ञांनी सदरील सिद्धांत आणि विस्तृत वृत्त मांडलं.
1993 ते 2010 दरम्यानच्या काळात भूगर्भातील 2150 गिगाटन इतक्या पाण्याचा उपसा करण्यात आला. यातील बहुतांश पाण्याचा वापर सिंचन आणि मानवी वापरासाठी करण्यात आला. ज्यानंतर हे पाणी समुद्राला जाऊन मिळालं.
पृथ्वीच्या भूजलपातळीचा पृथ्वीच्या गतीवर होणारा परिणाम, समुद्राला जलस्तर आणि त्याचा हवामानावर होणारा परिणाम या सर्व गोष्टी मांडताना दिसणार आहे.