अंतराळात सुनिता विलियम्सना ऐकू येतायत गूढ भयावह आवाज

Sep 02,2024

बोईंग स्टारलायनर

संकटात सापडलेलं नासाचं बोईंग स्टारलायनर हे कॅप्सुल तांत्रिक बिघाडांमुळं अद्यापही तिथंच अडकलं आता त्याविषयीची आणखी एक गंभीर माहिती समोर आली आहे.

भयावह आवाज

अधिकृत माहितीनुसार शनिवारी नासाच्या मोहिमेदरम्यान अवकाशात अडकलेल्या सुनिता विलियम्स आणि त्यांचे साहकारी बुच विल्मोर यांना काही भयावह आवाज ऐकू आल्याचं म्हटलं गेलं.

मिशन कंट्रोल

यानाच्या आत असणाऱ्या स्पीकरमधून हे आवाज ऐकू येत होते. विल्मोर यांनी ह्यूस्टनमध्ये मिशन कंट्रोलला माहिती देत म्हटलं, 'मला स्टारलायनरविषयी एक प्रश्न आहे. इथं स्पीकरमधून विचित्र आवाज येतोय. मला कळत नाहीय हा आवाज नेमका कशामुळं येतोय'.

स्पंदनासारखा आवाज

विल्मोर यांनी मिशन कंट्रोललाही हा आवाज ऐकवला. हा आवाज एका स्पंदनासारखा असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, अद्यापही या रहस्यमयी आवाजासंदर्भातील गूढ उकलू शकलेलं नाही.

नासा

दरम्यान, सध्या या गूढ आवाजांनी अनेक चर्चांना वाव दिला असून, नासाकडूनही या आवाजाची उकल करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

यानाचा मुक्काम

बोईंगचं स्टारलायनर हे यान अवकाशातच अडकलं असून, आता या यानाचा मुक्काम वाढल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्पेस एक्सच्या माध्य़मातून हे यान पृथ्वीवर परत आणलं जाणार आहे.

VIEW ALL

Read Next Story