जगभरात अनेक अशी ठिकाणे आहेत जी वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत.
परंतु, आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे 69 दिवस सूर्य मावळत नाही.
तसेच या ठिकाणी हिवाळ्यात जवळपास 90 दिवस सूर्य दिसत नाही. या ठिकाणी पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात.
हे खास ठिकाण नॉर्वेच्या पश्चिम भागात आहे. याचे नाव सोमारोय आइलँड आहे. या ठिकाणाला लँड ऑफ मिडनाईट देखील म्हटले जाते.
आर्कटिक सर्कलमध्ये आल्याने या ठिकाणी 18 मे ते 26 जुलैपर्यंत सूर्य मावळत नाही.
या ठिकाणी थंडी देखील जास्त असते. परंतु, हे आश्चर्यकारक ठिकाणांपैकी एक आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)