अनेकजण धावपळीच्या जीवनामध्ये जास्त करून विमानाने प्रवास करतात.
पण तुम्हाला जगातील सर्वात लांब ट्रेनबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
जगातील सर्वात लांब ट्रेन ही 13 देशांना जोडलेली आहे. ही ट्रेन युरोपमधील पोर्तुगाल ते आशियातील सिंगापूरपर्यंत जाते.
ही ट्रेन एकूण 18, 755 किलोमीटर अंतर पार करते. या ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 21 दिवस लागतात.
पोर्तुगाल ते आशियापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात ही ट्रेन फक्त 11 ठिकाणी थांबते.
या ट्रेनचे तिकीट 1350 डॉलर म्हणजेच 1,14309 रुपये इतके आहे. ज्यामध्ये तुम्हाला राहण्याची आणि जेवण्याची सोय आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)