इथं नागा चैतन्यननं शोभिता धुलीपालाशी लग्नगाठ बांधली आणि तिथं या कुटुंबातील गुंतागुंतीच्या नात्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं.
सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे अभिनेता नागार्जुनच्या दोन्ही लग्नांची.
नागार्जुनचं पहिलं लग्न 1984 मध्ये झालं होतं. लक्ष्मी दग्गुबती असं त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव.
तेलुगू चित्रपट निर्माते रामानायडू दग्गुबती यांची ती लेक. अभिनेता आणि निर्माता व्यंकटेश यांची ती बहीण.
नागार्जुन आणि लक्ष्मीच्या या नात्यात त्यांच्या लेकाचा म्हणजेच नागा चैतन्यचा जन्म 1986 मध्ये झाला होता. पुढं 1990 मध्ये मात्र नागा चैतन्यच्या आईवडिलांच्या नात्यात दुरावा आहा.
नागार्जुन आणि त्याची पहिली पत्नी वेगळे झाले आणि अभिनेत्यानं 1992 मध्ये अभिनेत्री अमालाशी लग्न केलं. 1994 मध्ये अमाला आणि नागार्जुनचा मुलगा, अखिल याचा जन्म झाला.
तिथं लक्ष्मी दग्गुबतीनंही सारथ विजयराघवन या व्यावसायिकासोबत नव्यानं वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली.
आईवडिलांप्रमाणं नागा चैतन्यचंही पहिलं लग्न अपयशी ठरलं. त्यानं 2017 मध्ये समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केलं. पण, 2021 मध्ये मात्र या जोडीनं घटस्फोटाचं पाऊल उचललं.
2024 मध्ये नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी लग्न करत पुन्हा वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.