सूर्य अचानक गायब झाला तर याची माहिती पृथ्वीवरील लोकांना 8 मिनिटे 16.6 सेकंदांतच मिळेल.
सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे 16.6 सेकंद लागतात.
सूर्य गायब झाल्यास 8 मिनिटे 16.6 सेकंदांनंतर पृथ्वीवर सर्वत्र अंधार होईल.
सूर्य किरणे नसल्यामुळे वनस्पती अन्न निर्माण करू शकणार नाहीत. जीवसृष्टी नाहीशी होईल.
सूर्य किरण नसल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही. परिणामी पाऊस पडणार नाही.
हवामानात बदल होऊन तापमान मायनस 50 डिग्री पेक्षा कमी होईल. नद्या, समुद्राचे पाणी गोठून बर्फ होईल.
24 तास लाईट लावावी लागेल. प्रकाश नसल्यामुळे विजेची मागणी वाढेल.
सूर्य हा उर्जा निर्मीतीचा प्रमुख स्त्रोत असल्यामुळे नविन उर्जा निर्मीती करणे अशक्य होईल.
सूर्यमाला विखुरली जाईल. आकाशात फक्त तारे दिसतील. इंद्राधनुष्य कधीच दिसणार नाही.