वॉल्टन परिवाराची एकूण संपत्ती 432.4 अरब डॉलर म्हणजेच 3659833 कोटी रुपये आहे. जी एलन मस्क आणि इतरांच्या संपत्तीच्या अनेकपट आहे.
वॉल्टन परिवाराच्या कमाईचा बहुतांश हिस्सा वॉलमार्टच्या 46 टक्के शेअर्समधून येतो. वॉलमार्टने मागच्या वर्षात 648.1 अरब डॉलरची कमाई केली.
वॉलमार्टच्या शेअर्समध्ये यावर्षी 80 टक्के तेजी आली. ज्यामुळे परिवाराच्या संपत्तीत 172.7 अरब डॉलर वृद्धी झाली.
याचा अर्थ वॉल्टन परिवार दरदिवशी 473.2 मिलियन डॉलर आणि प्रत्येक मिनिटाला 328577 डॉलर म्हणजेच 2.7869753 रुपयांची कमाई करतो.
यूएईचे प्रमुख अल नाहयान परिवार 323.9 अरब डॉलर संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहे. तेल उद्योगातून त्यांची संपत्ती उभी राहिली आहे.
कतरचा अल थानी परिवार 172.9 अरब डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानी आहे. तेल आणि गॅसच्या माध्यमातून ही कमाई होते.
फ्रान्सचा हर्मेस परिवार 170.6 अरब डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानी आहे. प्रसिद्ध लक्झरी ब्राण्ड हर्मेसचे ते मालक आहेत.
99.6 अरब डॉलर संपत्तीसह अंबानी परिवार आठव्या स्थानी आहे. यांच्या 3 पिढ्या रिलायन्स उद्योगात आहेत. जो सलग वाढतोय.
मिस्त्रि परिवार 41.4 अरब डॉलर संपत्तीसह 23 व्या स्थानावर आहे. जे शाहपूरची पालनजी ग्रुपचे नेतृत्व करतायत. (सोजन्य-ब्लूमबर्ग)