घाणेरड्या पदार्थांची यादी

Food Interesting Facts : नुकतंच Taste Atlas नावाच्या एका पोर्टलनं जगातील घाणेरड्या पदार्थांची यादी समोर आणलीय आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत 60 व्या स्थानी एका भारतीय पदार्थाचाही समावेश आहे.

Jan 03,2024

Hakarl

घाणेरड्या पदार्थांच्या यादीमध्ये आईसलँडमधील Hakarl पदार्थाचा समावेश आहे. हे खारवलेलं शार्क माशाचं मांस असतं.

रामेन बर्गर

अमेरिकेतील रामेन बर्गर हा या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

इस्रायलचा पदार्थ

इस्रायलमधील Yerushalmi Kugel हा पदार्थ यादीत तिसऱ्या स्थानी असून हा एक गोडाचा पदार्थ आहे.

चिलीचा पदार्थ

चौथ्या स्थानी स्वीडनचा Kalvysylta तर लाटवियातील Sklamdruasis पाचव्या आणि चिलीचा चॅपालेले हा पदार्थ सहाव्या स्थानी आहे.

स्पेनचा पदार्थ

यादीत सातवं स्थान मिळालंय स्वीडनच्या कार्ल्सक्रोव या पदार्थाला. आठव्या स्थानावर आहे स्पेनचा बोकादिलो दे कार्न दे कॅबालो हा पदार्थ.

मर्माईट अँड चिप्स सँडविच

नववं स्थान मिळालंय न्यूझीलंडच्या मर्माईट अँड चिप्स सँडविचला, तर दहावं स्थान आहे फिनलंडच्या ryynimkkara या पदार्थाला.

आलू बैंगन

आश्चर्याची बाब म्हणजे काहींची आवडती, काहींनी नावडती भाजी असणारी भारतातील आलू बैंगन अर्थाव वागं- बटाट्याची भाजी या यादीत 60 व्या स्थानी आणि भारतातील सर्वात घाणेरडी भाजी म्हणून गणली गेली आहे. यावर तुमचं काय मत?

VIEW ALL

Read Next Story