बॉलिवूडचे Action Hero खरंच अ‍ॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीक

Ajay Devgn Singham Again Video Leak : अजय देवगणचा सिंघम अगेनमधील अ‍ॅक्शन सीन शूट करतानाचा व्हिडीओ आला समोर... 

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2024, 05:14 PM IST
बॉलिवूडचे Action Hero खरंच अ‍ॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीक title=
(Photo Credit : Social Media)

Ajay Devgn Singham Again Video Leak : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. यंदाच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप जास्त उत्सुकता आहे. पण आता अजय देवगणचा पोलिसांच्या गणवेषातील एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ श्रीनगरचा असल्याचे म्हटले जाते. या व्हिडीओला पाहिल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे. त्याशिवाय बॉडी डबलला घेऊन कसे अ‍ॅक्शन सीन शूट होतात ते देखील पाहायला मिळालं आहे.

एका नेटकऱ्यानं हा व्हिडीओ आधीचं ट्विटर अकाऊंट म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अजय देवगनला सिंघम लूकमध्ये भर रस्त्यात अ‍ॅक्शन करताना पाहायला मिळालं आहे. त्यानंतर बॉडी डबल पुढच्या सीनचं शूट करताना दिसले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला शेअर करत नेटकऱ्यानं कॅप्शन दिलं आहे की अजय देवगन सिंघम 3 च्या शूटिंगसाठी श्रीनगर गेला आहे. बॉलिवूड आता काश्मिरमध्ये पोहोचल्यानंतर आता प्रेक्षकांना नक्कीच अजून आकर्षण वाढेल. 

याआधी अर्जुन कपूर जो या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या लूकचा फोटो समोर आला होता. फोटोत अर्जुन कपूरनं कुर्ता आणि धोती घातल्याचे त्यात पाहायला मिळाले. त्याचा हा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तर त्याचा या चित्रपटातील लूक पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी फक्त हे बोलत आहेत की हा सिंघय फ्रेंचायझीचा शेवटचा चित्रपट नसायला हवा. 

हेही वाचा : 'तरुणपणी असे नखरे दाखवायचे'; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर

दरम्यान, या चित्रपटात भली मोठी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात करीना कपूर, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, टाइगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सिंघम फ्रेंचायझीविषयी बोलायचे झाले तर 2011 मध्ये अजय देवगणचा सिंघम हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेत्री काजल अग्रवाल दिसली होती. याच चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागात अजय देवगणसोबत करीना नाही तर काजल अग्रवाल दिसली होती.