हाय बीपीची 'ही' 4 लक्षणे फक्त रात्रीच दिसतात, झोपेत घात होण्याची शक्यता

उच्च रक्तदाबाची काही लक्षणे आपल्याला दिसत असतात. पण त्याबाबत असलेल्या अज्ञानामुळे ही लक्षणे दुर्लक्षे केली जातात. महत्त्वाचं म्हणजे ही लक्षणे फक्त रात्रीच दिसतात. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 19, 2024, 08:21 AM IST
हाय बीपीची 'ही' 4 लक्षणे फक्त रात्रीच दिसतात, झोपेत घात होण्याची शक्यता  title=

High BP Symptoms In Night: रक्तदाबाच्या आजाराबाबत जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी, त्याची लक्षणे ओळखणे आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. अशावेळी शरीरातील रात्रीची दिसणारी लक्षणे झोपेत दुर्लक्ष करु नका. 

हाय बीपी किंवा उच्च रक्तदाब पातळीच्या बाबतीत, बऱ्याच वेळा लोकांना कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्याचप्रमाणे, उच्च रक्तदाबाची काही लक्षणे आहेत ज्याबद्दल लोकांना माहिती नसते कारण ही लक्षणे एकतर फारच किरकोळ असतात किंवा रात्री दिसतात. येथे तुम्ही उच्च रक्तदाबाची लक्षणे वाचू शकाल जी रात्री दिसतात.

थकवा

दिवसभर थकल्यासारखे वाटणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु जेव्हा जास्त वेळ विश्रांती घेतल्यानंतर किंवा झोपल्यानंतरही तुम्हाला आराम वाटत नाही, तेव्हा ती उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या असू शकते. त्याचे नेमके कारण आणि उपचार शोधण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या आणि आवश्यक चाचण्या करा. 

वारंवार लघवीला जाणे

जर तुम्हाला लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागत असेल तर ही देखील उच्च रक्तदाबाची समस्या असू शकते. अनेकदा लोकं रात्री लघवीला वारंवार उठतात त्यामुळे त्यांची झोपही व्यवस्थित होत नाही. यामुळे झोप नीट न झाल्यामुळे आणि वारंवार लघवीला गेल्यामुळे शरीरात थकवा निर्माण होतो आणि हाय रक्तदाबाचा त्रास अधिक होतो.

पायांना सूज येणे

पाय आणि खालच्या पायांमध्ये सूज आणि वेदना हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी किंवा सकाळी उठल्यावर तुमच्या पायात जास्त सूज दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांशी संपर्क साधा.

श्वसनविषयी दाह, फुफ्फुसातील दाह

जर तुम्हाला विश्रांती घेताना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या रक्तदाबाची पातळी जास्त असू शकते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता. अनेकदा श्वास घेताना त्रास होतो किंवा फुफ्फुसांमध्ये समस्या जाणवतात. अशावेळी रात्री दिसणाऱ्या या लक्षणांमध्ये दुर्लक्ष करु नका. जेणे करुन उच्च रक्तदाबाची शक्यता आणि त्रास कमी होईल. 

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)