Sam Pitroda Resigned : सॅम पित्रोदांनी दिला राजीनामा

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Sam Pitroda Resigned : सॅम पित्रोदांनी दिला राजीनामा

8 May 2024, 12:13 वाजता

भाजपमुळं गुजरातींची मस्ती वाढली - आदित्य ठाकरे

 

Aaditya Thacekray Interview : मुंबई गुजरातींची मस्ती भाजपमुळं वाढली, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.. मराठी गुजराती वादाबाबत झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत ते बोलत होते. मराठी माणसांना गुजराती सोसायट्यांमध्ये प्रचारासाठी मनाई केली जाते... भाजपमुळं ही मस्ती वाढलीय, असं त्यांनी सांगितलं.

8 May 2024, 11:41 वाजता

आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

 

Aaditya Thacekray Interview : भाजपचं सरकार डोक्यावर बसल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील... मटण खायचं की भाजी तेच सांगतील, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला... भाजपला स्वातंत्र्य हिरावून घ्यायचंय आणि भारताचा चीन करायचाय, असा टोलाही त्यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत बोलताना लगावला.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 May 2024, 10:35 वाजता

फायर टेंडर न दिल्यानं मारहाण

 

Mira Bhayandar : सोसायटीचे फायर टेंडर न दिल्याच्या आरोपातून एका अग्निशमन दलाच्या अधिका-यानं खजिनदाराला बेदम मारहाण केलीय. राई गावात हा प्रकार घडला. सोसायटीतील हळदीच्या कार्यक्रमात खजिनदार आणि अधिका-याची बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाची रुपांतर मारहाणीत झालं. या मारहाणीत खजिनदाराच्या पायाला गंभीर दुखापत झालीय.हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रीत झालाय. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केलाय.

बातमी पाहा - फायर टेंडर न दिल्याच्या रागातून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याकडून मारहाण

8 May 2024, 10:32 वाजता

पवारांचं भाकित, चर्चांना उधाण

 

Sharad Pawar : भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकित शरद पवारांनी केलंय...एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत शरद पवारांचं हे वक्तव्य केलंय...वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोतो...काँग्रेस आणि आमच्या पक्षात वैचारिक मतभेद नाहीत...काँग्रेस आणि आम्ही नेहरु-गांधींच्या विचारसरणीचे असल्याचं पवारांनी म्हटलंय...मात्र, पवारांच्या या विधानाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 May 2024, 10:04 वाजता

नाशिकचे 400 कंटेनर्स JNPTत अडकले

 

Nashik Onion : कांदा निर्यात करणारे नाशिकचे 400 कंटेनर्स नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरात अडकून पडलेत.. केंद्र सरकारच्या किमान मूल्या कराबाबत कुठलाही आदेश नसल्यानं JNPTबाहेर कांद्याच्या कंटेनर्सच्या रांगा लागल्यात.. याचा फटका अनेक व्यापा-याना बसलाय.. कांदा निर्यातीसाठी आणखी दोन दिवस लागणार असल्यानं व्यापा-यांना गाडी आणि जहाज भाड्याचा नाहक भुर्दंड बसतोय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 May 2024, 10:00 वाजता

चिकन शॉर्मा खाऊन तरुणाचा मृत्यू

 

Mumbai Shawarma Death : मानखुर्दमध्ये चिकन शॉर्मा खाऊन एका तरुणाचा मृत्यू झालाय.. तर अनेकजणांना विषबाधा झालीये.. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात ही घटना घडलीये..  या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी रस्त्यावर निकृष्ट शॉर्मा बनवून विकणा-या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केलीये.. या घटनेनंतर मुंबईच्या रस्त्यावरील निकृष्ट अन्न पदार्थांचा मुद्दा पुन्हा चर्चेता आलाय.. असे निकृष्ट अन्न विकणा-या दुकानांवर पालिकेचं नियंत्रण राहिल नसल्याचं यावरुन उघड होतंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 May 2024, 08:17 वाजता

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला

 

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय.. आज शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभाहोणार आहे.. अहमदनगरमध्येही पवारांची सभा होणार आहे.. तर संजय वाघेरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगवीत सभा घेणार आहेत.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांच्याही आज नंदुरबार आणि अहमदनगरमध्ये सभा होणार आहेत.. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेरमध्ये सभा घेणार आहेत... श्रीगोंदा आणि अहमदनगरमध्ये खासदार संजय राऊत मविआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर बीडमध्ये सभा घेणार आहेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

लोकसभा निवडणुकांचे LIVE अपडेट्स पाहा - Loksabha Election 2024: आता तयारी चौथ्या टप्प्याची! आजचा दिवस सभांचा

8 May 2024, 08:15 वाजता

महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला

 

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात मतदानाचा टक्का चांगलाच घसरलाय... लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात सरासरी 61.44 टक्के मतदान झालंय. तर देशभरात तिस-या टप्प्यात 94 मतदारसंघात सरासरी 60.19 % मतदानाची नोंद झालीय... देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा मतदानाचा टक्का कमी झालाय.. विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर राज्यातील ११ मतदारसंघात सरासरी 63.81% इतकं मतदान झालं होतं. त्या तुलनेतही यंदा महाराष्ट्रात मतदान कमी झाल्याचं स्पष्ट होतंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 May 2024, 08:12 वाजता

आदित्य ठाकरेंचा मनसेवर निशाणा

 

Aaditya Thacekray Interview : राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सक्रीय झाल्यानंतर मनसेविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत बिनशर्त पाठिंब्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधला.. मुंबईत मराठी माणसाला विरोध करणा-या गुजरातींना मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. उत्तर भारतीयांना मारहाण करणा-या मनसेचा पाठिंबा भाजपला चालतो का? अशी विचारणाही त्यांनी भाजपला केली...

बातमीचा व्हिडीओ पाहा -