Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान पार पाडलं. यानंतर आता चौथ्या टप्प्याच्या निवडणूकांच्या प्रचाराकडे मोर्चा वळणार आहे.
8 May 2024, 19:42 वाजता
Loksabha Election 2024 Live:
उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघासाठी प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये ठिय्या मांडून आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपवली आहे. रायबरेलीतून राहुल गांधी निवडणुकीच्या मैदानात आहेत.
8 May 2024, 19:29 वाजता
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची अंतिम टक्केवारी जाहीर
सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 59.19 टक्के मतदान, तर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये 63.65 टक्के मतदान
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळमध्ये सर्वाधिक 63.15 टक्के मतदान, तर माढा लोकसभा मतदारसंघात 66.13 टक्के सर्वाधिक मतदान
2019 च्या तुलनेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात 0.73 टक्के मतदानात वाढ
8 May 2024, 17:16 वाजता
ही लढाई विचारांची आहे : रोहित पवार
गेले काही दिवस पवार साहेबांची तब्बेत ठीक नाही, सुप्रिया ताई, आम्ही सगळे त्यांना विनंती करतोय, पण पवार साहेब कोणाचं ऐकत नाही. ते म्हणतात मी जर थांबलो, तर भाजपच्या महाशक्तीला ताकद मिळेल, मी थांबणार नाही. कारण त्यांना माहिती आहे ही लढाई विचारांची आहे - रोहित पवार
8 May 2024, 17:16 वाजता
आदित्य ठाकरे यांचा उद्या मावळ लोकसभा दौरा
मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या उद्या दोन सभा, सायंकाळी 4 वाजता खारघर आणि कामोठे येथे बाईक रॅलीच आयोजन
रात्री 6.30 वाजता कर्जत येथे पहिली सभा, तर रात्री 8.30 वाजता आदित्य ठाकरे यांची उरण येथील नानासाहेब धर्माधिकारी मैदानात सभा
उद्धव ठाकरे यांची आज मावळ येथे सभा होत असताना उद्या आदित्य ठाकरे उर्वरित मावळ लोकसभेत प्रचार करणार
8 May 2024, 14:44 वाजता
स्वतःच्या स्वार्थासाठी जात विकू नका, खोटे बोलून जातीची फसवणूक करू नका - मनोज जरांगे पाटील
समाज म्हणून आतापर्यंत कुणीच कामाला आलेलं नाही. महाविकास आघाडी, महायुती, अपक्ष माझा विरोध कुणालाही नाही. मीही राज्यामध्ये अनेक जणांना उभं करू शकलो असतो मात्र मतांची विभागणी होईल म्हणून उभं केलं नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
8 May 2024, 13:54 वाजता
नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे 17 मे रोजी एकाच मंचावर
लोकसभा निवडणूक प्रचार आणि सभा संदर्भात आज मनसे नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीला मनसे अमित ठाकरे,बाळा नांदगावकर , नितीन देसाई ,संदीप देशपांडे यांच्यासह पदाधिकारी हजर होते. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यापासून मनसेचे सर्व कार्यकर्ते मन लावून प्रचारात उतरले आहेत. आता येत्या 17 मे रोजी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित जाहीर सभा होणार आहे, असे बाळा नादगांवकर म्हणाले.
8 May 2024, 13:52 वाजता
पूर्वी देशभरातील निवडणुका 2 दिवसात व्हायची, आता महाराष्ट्रात 4 टप्प्यात होत आहे. तामिळनाडू मध्ये एकाच टप्प्यात आहे. महाराष्ट्रात 4 टप्प्यात का? कारण मोदींना राज्याचे जास्त प्रचार करता यावा, असेही शरद पवार यांनी म्हटले.
8 May 2024, 13:51 वाजता
मोदी काल इथे आले राज्यात येतात माझ्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात काही हरकत नाही आमच्यावर बोलले हा आमचा बहुमान आहे - शरद पवार
8 May 2024, 12:52 वाजता
रावसाहेब दानवेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जालन्यात होणाऱ्या सभेत मविआच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं. उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केलं तर मी राजकारण सोडेन असं चॅलेंज दानवेंनी ठाकरेंना दिलंय.
8 May 2024, 12:11 वाजता
प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मला वाटत नाही., शरद पवारांचा अनुभव मोठा आहे ते काय संकेत देत असतील मला महिती नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी शरद पवारांच्या विधानावर दिली आहे.