हैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video Viral

Sanjiv Goenka angry on Kl Rahul:  बुधवारी झालेल्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये संजीव गोएंका लखनऊचा कर्णधार के.एल राहुलवर संतापलेले दिसतायत. 

सुरभि जगदीश | Updated: May 9, 2024, 09:10 AM IST
हैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video Viral title=

Sanjiv Goenka angry on Kl Rahul: बुधवारी आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएंट्सचा धुव्वा उडवला. यावेळी लखनऊला 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. यावेळी के.एल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊचा हा सहावा पराभव होता. याशिवाय गेल्या सामन्यातही कोलकात्याकडून टीमला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या सामन्यानंतर भर मैदानात एक अशी घटना घडली, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. 

दरम्यान बुधवारी झालेल्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये संजीव गोएंका लखनऊचा कर्णधार के.एल राहुलवर संतापलेले दिसतायत. यावेळी गोएंकाच्या हावभावावरून सामना हरल्यामुळे ते के.एल राहुलवर संतापल्याचं म्हटलं जातंय. इतकंच नाही तर यावेळी राहुल त्यांचं शांतपणे ऐकून घेतोय. ( दरम्यान या व्हायरल व्हिडीओची झी 24 तास खातरजमा करत नाही )

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गोयंका केएल राहुलसमोर आपला राग व्यक्त करतायत. यावेळी टीमचे कोच प्रशिक्षक जस्टिन लँगरही मध्ये आले. लँगर आल्यानंतरही संजीव गोयंका यांचा राग कमी झाला नाही आणि त्यांनी प्रशिक्षकासमोरही त्यांचं म्हणणं मांडताना दिसले. यावेळी केएल राहुल थोडा अस्वस्थ दिसला आणि तो तेथून निघून गेला. 

चाहत्यांचा या घटनेवर रोष

सोशल मीडिया युझर्सना मात्र हे वागणं रूचलेलं नाही. चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही मालकाने खेळाडूंशी अशा प्रकारे संवाद साधू नये. याचं कारण म्हणजे मैदानात अनेक कॅमेरे असून सर्व गोष्टी त्यात टिपल्या जातात. 

सनरायझर्स हैदराबादचा मोठा विजय

सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच लखनऊ सुपर जायंट्सचा (SRH demolish LSG) पराभव केला. हैदराबादने 10 गडी राखून हा ऐतिहासिक विजय नोंदवला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 ओव्हरमध्ये चार विकेट्स गमावून 165 रन्स केलेले. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या टीमने 10 ओव्हरमध्ये म्हणजेच 9.4 ओव्हरमध्ये 166 रन्सचं लक्ष्य गाठलं होतं. हैदराबादने 62 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला अन् मोठ्या विक्रमाची नोंद केली.