मोठ्या पडद्यावर बोल्ड भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा पारंपारिक लूक

सध्या ही अभिनेत्री शाहरुख खानच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असतानाच तिचे ओणम सेलिब्रेशनचे फोटो समोर आलेत

हिंदीमध्ये करतेय पदार्पण

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री नयनतारा लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. त्यामुळेच ती सध्या चर्चेत आहे.

जवानमधील दमदार झलक

अभिनेता शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या जवान चित्रपटामधून नयनतारा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तिची दमदार झलक पाहायला मिळाली.

जुळ्या मुलांबरोबर फोटो

मात्र नुकतेच नयनताराचे काही फोटो व्हायरल झाले असून तिच्या जुळ्या मुलांबरोबर ती दिसत आहे. हे फोटो ओणमचे आहेत.

कुटुंबाबरोबर साजरा केला ओणम

केरळमध्ये भात लावणी साजरी करण्यासंदर्भातील ओणम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण नयनताराने आपल्या कुटुंबाबरोबर साजरा केला.

मुलं आणि पतीबरोबरचे फोटो

पती विग्नेश शिवान तसेच जुळी मुलं उरी आणि उलग यांच्याबरोबरचे नयनताराचे पारंपारिक पोषाखातील फोटो समोर आले आहेत.

पारंपारिक वेशात जुळी मुलं

धोतर, चैन घालून पारंपारिक वेशात असलेले उरी आणि उलग फारच गोंडस दिसत आहेत. "उरी आणि उलगबरोबरचा पहिला ओणम सण," अशी कॅप्शन विग्नेशने या फोटोंना दिली आहे.

रोमँटिक फोटो चर्चेत

विग्नेशने पत्नी नयनताराबरोबरचे काही रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत. "आमच्या साध्या सुध्या जगात... ओणमच्या निमित्ताने एक सुंदर आणि साधा क्षण अनुभवतानाही फार खास वाटतंय..."; अशी कॅप्शन त्याने दिली आहे.

नयनताराचा पती आहे दिग्दर्शक

नयनताराचा पती विग्नेश शिवान हा पेशाने दिग्दर्शक आहे. नयनतारा आणि विग्नेश 2015 साली पहिल्यांदा चित्रपटाच्या सेटवर भेटले.

साखरपुड्याची सोशल मीडियावरुन घोषणा

25 मार्च 2021 रोजी विग्नेशने सोशल मीडियावर साखरपुडा झाल्याचं सांगताना बोटांमध्ये रिंग घातल्याचा फोटो शेअर केला होता.

लग्नाआधी दुसऱ्या दिग्दर्शकाबरोबर 4 वर्ष लिव्ह-इनमध्ये होती

दोघांनी 2022 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांनी गुपचूप लग्न केलं. नयनतारा आणि प्रभु देवा पूर्वी 4 वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.

VIEW ALL

Read Next Story