चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण

'टारझन: द वंडर कार' चित्रपट प्रदर्शित होऊन 19 वर्षे झाली आहेत. टारझन चित्रपटामध्ये एक मेकॅनिक चमत्कारिकरित्या त्याच्या मृत वडिलांच्या कारचे सुपरकारमध्ये रूपांतर करतो.

चित्रपटातील राज

या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेता वत्सल सेठ मुख्य भूमिकेत दिसला होता.

अजय देवगच्या मुलाच्या भूमिकेत होता वत्सल

2004 च्या चित्रपटात वत्सलने अजय देवगणच्या मुलाची भूमिका केली होती, जो आपल्या मृत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार डिझाइन करतो.

वत्सलने शेअर केले न पाहिलेले फोटो

त्याचवेळी, चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनेता वत्सल सेठने काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो या चित्रपटाच्या सेटवरून घेण्यात आली आहेत.

कारची सुद्धा होती भूमिका

एका फोटोत वत्सल शेठ चित्रपटात वापरलेल्या कारवर बसलेला दिसत आहे. या कारला चित्रपटात 'टारझन' असे नाव देण्यात आले होते.

आयशा टाकियाचा पहिला चित्रपट

या चित्रपटात वत्सल सेठसोबत अभिनेत्री आयशा टाकियाही दिसली होती. या चित्रपटातून आयशाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली

मुख्य अभिनेता म्हणून वत्सलचा पहिला चित्रपट

मुख्य अभिनेता म्हणून वत्सलचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. हा चित्रपट मुले आणि टीव्हीच्या दर्शकांमध्ये हिट झाला पण वत्सलच्या करिअरला फारशी उंची मिळू शकली नाही. (सर्व फोटो - @vatsalsheth/instagram)

VIEW ALL

Read Next Story