मानसिक त्रासासाठी 3000 रुपये

तसेच विमा कंपनीमुळे झालेल्या मानसिक त्रासासाठी 3 हजार रुपये आणि खटला चालवण्यासाठी 2 हजार रुपये असे एकूण 5 हजार देण्याचे आदेश दिले आहेत.

विमा कंपनीला क्लेमला न्यायालयाचे आदेश

न्यायालयाने विमा कंपनीला क्लेमचे 44 हजार 468 रुपये देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ज्या तारखेला क्लेम फेटाळण्यात आला होता,तेव्हापासून आतापर्यंत त्यावर 9 टक्के व्याज द्यावे असे आदेशही दिले गेले आहेत.

डॉक्टरच निर्णय घेणार

रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे की नाही, हे विमा कंपनी ठरवू शकत नाही. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन केवळ डॉक्टरच निर्णय घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्याची गरज नाही

ग्राहक मंचाने दिलेल्या या निर्णयानुसार मेडिक्लेमची रक्कम मिळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयात अ‍ॅडमिट करून घेतले पाहिजे किंवा त्याला 24 तास रुग्णालयात दाखल केले पाहिजे याची गरज नाही.

ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय

मात्र आता ग्राहक न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे मेडिक्लेम (Mediclaim) विम्याचा पैसा हवा असेल तर रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्याची गरज नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

आरोग्य विमा असेल तर...

सुरूवातीला जर तुम्ही आरोग्य विमा (Health insurance)घेतला असेल आणि त्यांची रक्कम तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला रुग्णालयात (Hospital) अॅडमिट व्हावे लागत होते.

VIEW ALL

Read Next Story