परफेक्ट पराठा

स्टफिंग बाहेर न पडता कसा बनवावा एकदम परफेक्ट पराठा?

हिवाळा आणि पराठे

हिवाळ्यामध्ये मुळा, बटाटा, पालक किंवा तत्सम भाज्यांचे पराठे बनवण्याकडे अनेकांचाच कल असतो.

पराठा लाटताना फाटतो

अनेकदा पराठा बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि तयारीच कित्येकांना नकोशी वाटते. पराठा लाटताना फाटतो, तव्याला चिकटतो या आणि अशा अनेक तक्रारी गृहिणी करतात.

पालेभाजीचा पराठा

तुम्ही पालेभाजीचा पराठा करत असाल तर, सर्वप्रथम ती कुस्करून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या. मोकळी करून वाळवून घ्या.

मीठाचं प्रमाण

पराठे लाटताना फाटणार नाही यासाठी मीठाचं प्रमाणही महत्त्वाचं आहे. बटाट्यासोबत मीठ मिसळतं. पण, पालेभाजीमध्ये मात्र ते बेतानं वापरा.

मीठ शेवटीच मिसळा

पालेभाजीमध्ये मीठ मिसळताच ती पाणी सोडायला सुरुवात करतं. त्यामुळं मीठ शेवटीच मिसळा.

पीठातच भाजी मिसळा

बटाटा किंवा पालेभाजीचा पराठा करताना पीठातच भाजी मिसळा आणि पीठ मळून घ्या.

पीठ पोळीसारखं लाटून घ्या

थोडक्यात पुरणपोळी सारळं सारण मध्ये न भरता थेट भाजी मिसळलेलं पीठ पोळीसारखं लाटा. म्हणजे ते लाटताना फाटणार नाहीत.

VIEW ALL

Read Next Story