विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा

निर्जला एकादशीला विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नम: या मंत्राचा जप करा.

तुळशीच्या बाजूला घाण करु नका

निर्जला एकादशीला तुळशीच्या आजुबाजूला घाण करु नका. तुळशीजवळ चपला ठेवू नका किंवा करचा साठू देऊ नका.

घाणेरड्या किंवा उष्ट्या हाताने स्पर्श टाळा

तुळशीला घाणेरड्या किंवा उष्ट्या हाताने स्पर्श करु नका. एकादशीला ही चूक केल्या लक्ष्मी नाराज होऊन घरातून बाहेर जाऊ शकते.

पान तोडताना नखाचा वापर टाळा

नखाच्या सहाय्याने कधीही तुळशीचं पान तोडू नका. सर्वात आधी तुळशीला नमस्कार करा आणि त्यानंतर हलक्या हाताने पान तोडा.

तुळशीची पानं तोडू नका

एकादशीला तुळशीची पानं तोडू नका. जर तुम्हाला तुळशीचं पान लागणार असेल तर ते आदल्या दिवशीच तोडून ठेवा.

तुळशीला पाणी घाला

तुळशीच्या रोपात लक्ष्मीदेवीचं वास्तव्य असतं आणि एकादशीला लक्ष्मी निर्जला उपवास ठेवते. यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घाला.

31 मे रोजी निर्जला एकादशी

निर्जला एकादशीला तुळशीशी संबंधित गोष्टींचा लाभ होतो. यावर्षी 31 मे रोजी निर्जला एकादशी येत असून त्यादिवशी तुळशीशी संबंधित 5 चुका टाळा.

निर्जला एकादशी सर्वात श्रेष्ठ

हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताचं विशेष महत्त्व आहे. वर्षात एकूण 24 एकादशी येत असून, निर्जला एकादशी त्यात सर्वात श्रेष्ठ असल्याचं सांगण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story