छाया दान

शनिवारी एका लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा. यानंतर हे तेल शनि मंदिरात दान करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

हनुमानजींची पूजा

हनुमानजींची पूजा करणाऱ्यांवर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिपूजेसोबतच हनुमानजींचीही पूजा करावी.

पिंपळाची पूजा

शनिवारी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पीपळाची पूजा केल्यास शनिदेवाच्या कृपेसोबतच लक्ष्मीची कृपाही तुमच्यावर राहते.

मंत्रांचा जप करा

शनिवारी ‘ओम प्राण प्रथम प्रौं स: शनैश्चराय नमः’ आणि ‘ओम शं शनिश्चराय नमः’ या दोन मंत्रांचा जास्तीत जास्त जप करा.

अन्नदान करा

शनीची साडेसाती असल्यास मांसाहार आणि मद्यपानापासून दूर रहा. अन्यथा शनिदेवाचा तुमच्या कोप वाढतो. या लोकांनी शनि जयंतीला काळे श्वान, कावळा किंवा काळ्या बैलाला अन्नदान करा. हा उपाय केल्या शनिदेवाचा राग कमी होतो, असं म्हणतात.

हे करु नका

पूजा करताना शनिदेवाच्या डोळ्यात पाहू नका. असं म्हणतात की शनिदेवाच्या डोळ्यात पाहिल्यास घरात संकट येतात. त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कायम चरणाकडे पाहावे.

धतुऱ्याचं बीज अर्पण करा

शनीची धैय्या किंवा साडेसातीचा त्रास असेल तर शनि जयंतीच्या दिवशी धतुऱ्याचं बीज अर्पण करावं. भगवान शंकर हे शनिदेवाचे दैवत असल्याने शनि जयंतीच्या दिवशी भोलेनाथाची पूजा करा. ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय केल्यास सर्व संकटं दूर होतील.

हनुमान चालीसा

सतत आजारपण त्यांच्या पाठीशी लागलेलं असतं. या सर्व संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या लोकांनी नियमितपणे हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पठाणचं वाचण करावं. त्याशिवाय शिव मंदिरात पूजा आणि दान करावं.

शनीची साडेसाती

ज्योतिषशास्त्रांनुसार मकर, मीन आणि कुंभ राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे. त्यामुळे त्यांनी कामात कितीही मेहनत केली तरीही यश मिळत नाही.

हे उपाय करा

तुमच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनिचा त्रास असल्यास शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.

विधीवत पूजा

शनि देवाची विधीवत पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात आणि शनिदेवाच्या धैय्यापासून आपली मुक्ती होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

शनि शिंगणापूर

आज महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर, नवी दिल्लीतील शनि धाम मंदिर, तमिळनाडूमधील तिरुनल्लरु मंदिर आणि मथुरामधील कोकिलावन मंदिरात भक्तांची गर्दी दिसून येते.

आजच करा 'हे' उपाय

शनिचं नाव घेतलं की प्रत्येकाला भीती वाटते. शनिदेव न्यायाची देवता आहे. त्यामुळे चांगले कर्म केल्यास चांगलं फळ आणि वाईट कर्म केल्यास शनिदेवतेचा प्रकोप दिसतो.

वर्षभर 'या' राशींवर शनिचा प्रकोप!

वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 नक्षत्र आणि 12 ग्रहांना खूप महत्त्व आहे. नक्षत्र आणि ग्रहांच्या हालचालीवर आपल्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतात.

VIEW ALL

Read Next Story