टोकिया ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जसप्रीत बुमराहा हा आपला आवडता वेगवान गोलंदाज असल्याचं सांगितलं.

बुमराहची बॉलिंग अॅक्शन आपल्याला आवडते असं नीरजने सांगितलं. पण त्याचबरोबर नीरजने बुमराहला एक सल्लाही दिलाय.

बुमराहने आपला रन अप वाढवला तर त्याच्या बॉलिंगचा वेग आणखी वाढेल असा सल्ला नीरजने बुमराहला दिला आहे.

भालाफेकीतल्या आपल्या अनुभवातून हा सल्ला देत असल्याचं नीरजने सांगितलं. भालाफेकीतही रनअप घ्यावा लागतो.

भालाफेकीव्यतिरिक्त नीरज चोप्राला क्रिकेट हा खेळ आवडतो. गोलंदाजी करायला आपल्याला आवडते असं नीरजने म्हटलंय.

नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बुमराहने 11 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यादीत तौ चौथ्या क्रमांकावर होता.

बुमराह भारतासाठी 30 कसोटी, 89 एकदिवसीय आणि 62 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. कसोटीत 128, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 149 आणि टी0 क्रिकेटमध्ये 74 विकेट घेतल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story