IPL 2024 मध्ये 'या' तीन संघांचे कर्णधार बदलले

IPL 2024 सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सलामीचा सामना रंगेल.

तीन संघांना नविन कर्णधार

या हंगामाच्या सुरुवातीलाच काही संघात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. तब्बल तीन संघांना नविन कर्णधार मिळाला आहे.

मुंबई इंडियन्स

यात सर्वात पहिलं नाव आहे ते मुंबई इंडियन्सचं. पाचवेळा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला काढून मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्स

आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याने या हंगामात मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री केली. आणि थेट कर्णधारपद मिळवलं.

आयपीएलच्या अकरा हंगामानंतर पहिल्यांदा रोहित शर्मा खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. 2013 पासून रोहित मुंबईचा कर्णधार होता.

हार्दिक पांड्याच्या मुंबईत जाण्याने गुजरात टायटन्सने युवा स्टार फलंदाज शुभमन गिलला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

सनरायजर्स हैदराबाद

सनरायजर्स हैदराबादनेही कर्णधार बदलला आहे. एडन मार्करमला हटवून फ्रँचाईजीने ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सला कर्णधार बनवलं आहे.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंतचं पुनरागमन होणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टत नाही. त्यामुळे यावेळी डेव्हिड वॉर्नरच्या जागी मिशले मार्शला कर्णधारपदाची जबाबादीर मिळू शकते.

VIEW ALL

Read Next Story