Apple iPhone 15 ची विक्री सुरु

Apple iPhone 15 Launch: अॅप्पल iPhone 15 च्या विक्रीला भारत आणि इतर देशांमध्ये सुरुवात झाली आहे. यामध्ये एकूणण चार मॉडेल्सचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात भारत, ऑस्ट्रेलियासह अंदाजे ४० देशांमध्ये iPhone 15 खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

चार मॉडेल्स

Apple ने नुकत्याच लाँच केलेल्या iPhone 15 मध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max चार मॉडेल्स आहेत.

तीन स्टोरेज क्षमता, पाच रंग

iPhone 15 आणि iPhone 15 Plus तीन स्टोरेज क्षमता (128GB, 256GB, 512GB) आणि पाच रंगांमध्ये (गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळा) उपलब्ध आहेत.

किंमत किती?

128GB स्टोरेज असणाऱ्या iPhone 15 ची किंमत 79,900 पासून सुरू होते, तर iPhone 15 Plus ची किंमत 89,900 पासून सुरू होते.

128GB स्टोरेज असणाऱ्या iPhone 15 Pro ची किंमत 1 लाख 34 हजार 900 रुपये आहे. तस 256GB iPhone 15 Pro Max ची किंमत 1 लाख 59 हजार 900 आहे.

प्रचंड प्रतिसाद

सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, iPhone 15 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मागणी इतकी जास्त आहे की अनेक देशांमध्ये किमान नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत नवीन ऑनलाइन ऑर्डर येणार नाहीत.

Apple Watch आणि AirPods Pro

तसंच Apple ने 12 सप्टेंबरला USB-C कार्यक्षमतेसह Apple Watch सीरिज आणि AirPods Pro लाँच केले आहेत. Apple Watch Series 9 ची किंमत 41 हजार 900 पासून सुरू होते, तर Apple Watch SE (2nd gen) ची किंमत 29 हजार 900 पासून सुरू होते.

लोकांच्या खरेदीसाठी रांगा

iPhone 15 खरेदी करण्यासाठी दिल्ली, मुंबईत अॅप्पलच्या रिटेल स्टोअरबाहेर लोकांनी रांगा लावल्या आहेत. iPhone 15 Pro आणि Pro Max मॉडेल्स हे बेस्ट सेलिंग ठरण्याची शक्यता आहे. तसंच कंपनीसमोर सणांमध्ये मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचं आव्हान असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story