टीम इंडियाचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्माने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध एशिया चषक 2023 च्या सुपर 4 सामन्यात शानदार विक्रम केला आहे.
एशिया कपच्या सुरुवातीपासूनच रोहित चांगल्या फॉर्मात आहे. त्यातच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 'हिटमॅन' ने 48 चेंडूत 53 धावांची तुफानी इनिंग खेळली.
रोहित शर्माच्या या स्फोटक खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यासह रोहित शर्माने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला आहे.
रोहित शर्मा आता एशिया कपच्या इतिहासात 'सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज' बनला आहे.
या बाबतीत रोहित शर्माने पाकिस्तानचा माजी कर्णधार 'शाहिद आफ्रिदीलाही' मागे टाकले आहे. रोहित शर्माने एशिया कपच्या इतिहासात 25 डावांमध्ये सर्वाधिक 28 षटकार ठोकले आहेत.
एशिया कपच्या इतिहासात शाहिद आफ्रिदीने 21 डावात 26 षटकार ठोकले होते.
श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. एशिया चषकच्या इतिहासात सनथ जयसूर्याने 24 डावात 23 षटकार ठोकले होते.
सोबतच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.