स्टिव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव स्मिथ या यादीत दाव्या क्रमांकावर आहे. स्टिव्ह स्मिथचं नेटवर्थ 247 कोटी इतकं आहे.

युवराज सिंह

भारताला 2011 चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणारा डावखुरा फलंदाज युवराज सिंह नवव्या क्रमांकावर आहे. युवराज 288 कोटी रुपयांचा मालक आहे.

वीरेंद्र सेहवाग

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने क्रिकेटमधून राजीनामा घेतला असला तरी समालोचनाच्यानिमित्ताने आजही तो क्रिकेटशी जोडला गेला आहे. सेहवागची संपत्ती 329 कोटी रुपये इतकी आहे.

ब्रायन लारा

वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा 494 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह सातव्या क्रमांकावर आहे.

जॅक कॅलिस

दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस या यादीत साहव्या क्रमांकावर आहे. कॅलिसचं नेटवर्थ 577 कोटी रुपये इतकं आहे.

रिकी पॉण्टिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग आजही तितकाच लोकप्रिय आहे. पॉण्टिंगी 617 कोटी इतक्या संपत्तीचा मालक आहे.

विराट कोहली

या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली. कोहलीने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 74 वं शतकं ठोकलं. कोहलीची कमाई आहे 923 कोटी रुपये इतकी

महेंद्रसिंग धोणी

तर भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधाकर महेंद्रसिंग धोणी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोणीचं नेटवर्थ जवळपास 949 कोटी इतकं आहे.

सचिन तेंडुलकर

या दुसऱ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने क्रिकेटला अलविदा केला असला तरी त्याची क्रेझ आजही कायम आहे. सचिनच्या संपत्तीचा आकडा 1402 इतका आहे.

अॅडम गिलख्रिस्ट

अहवालानुसार ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकिपर आणि सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. गिलख्रिस्टची नेटवर्थ जवळपास 3,314 कोटी रुपये इतकी आहे.

जगातील श्रीमंत क्रिकेटपटू

जगभरातील क्रिकेटर्समध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू कोण? यासंबंधी सर्व क्रिकेटपटूंच्या कमाईचा CEO वर्ल्ड मॅगझीनने अभ्यास केला. त्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंची यादी तयार करण्यात आली.

VIEW ALL

Read Next Story