अमिताभ बच्चन यांनी स्वत: यामागील कारण सांगितलं आहे. पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत...
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही.
अमिताभ हे वयाच्या 80 व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल इतक्या एनर्जी आणि उत्साहाने काम करतात.
अमिताभ यांच्या याच उत्साहामुळे मनोरंजन क्षेत्रात आल्यानंतर अनेक दशकं उलटल्यानंतरही त्यांच्याबद्दलची चाहत्यांमधील क्रेझ कमी झालेली नाही.
अमिताभ यांची लोकप्रियता आणि चाहत्यांमधील क्रेझ पहायची असेल तर रविवारी मुंबईमधील जुहू येथील अमिताभ यांच्या 'जलसा' या बंगल्याबाहेर जावं असं म्हटलं जातं.
असं म्हणण्यामागील कारण म्हणजे अमिताभ यांना भेटण्यासाठी दर रविवारी न चुकता शेकडो चाहते 'जलसा'बाहेर गर्दी करतात.
विशेष म्हणजे अमिताभ ज्या ज्या रविवारी घरी असतात तेव्हा आवर्जून या चाहत्यांची भेट घेतातच.
अमिताभ त्यांच्या बंगल्याच्या गेटजवळ असलेल्या एका पोडियमवर येऊन आपल्या चाहत्यांना नमस्कार करुन त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतात.
मात्र चाहत्यांना भेटायला येताना अमिताभ हे कधीच पायात चप्पल किंवा शूज घालत नाहीत. मात्र असं अनावणी चाहत्यांना भेटण्यासाठी येण्यामागे एक खास कारण असल्याचं अमिताभ सांगतात.
अनवाणी येऊन बंगल्याच्या गेटवर चाहत्यांना अभिवादन करण्यासंदर्भात अनेकदा विचारण्यात आल्याचं अमिताभ यांनी नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आपण असं का करतो याबद्दल अमिताभ यांनी, "हो मी चप्पला न घालता चाहत्यांना भेटतो. तुम्ही मंदिरामध्ये अनवाणीच जाता ना? रविवारी भेटायला गर्दी करणारे माझे हिंतचिंतक हे मला एखाद्या मंदिराप्रमाणेच आहेत. आता तुम्हाला यासंदर्भात काही अचडणी नसावी," असं इन्स्ताग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.