नवीन वर्षाच्या सुरुवातीला अश्विनीने एका हॉट आणि सेन्सेशनल फोटोशूटमधून स्वतःचा असा एक वेगळा लूक प्रेक्षकांसमोर सादर केला आहे.
2025 च्या सुरुवातीला अश्विनीचा हा नवा लूक चाहत्यांसाठी एक सरप्राईज ठरला आहे. तिच्या या बोल्ड लूकने तिचे चाहते थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर तिच्या या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत आणि तिच्या या धाडसी निर्णयाचं जोरदार कौतुक केलं जात आहे.
नवीन वर्षाची सुरुवात ग्लॅमरस फोटोशूटने झाल्यावर, अश्विनी याच वर्षात मराठी आणि साऊथचं दमदार कोलॅबरेशन 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' आणि 'जिलबी' या चित्रपटात झळकणार आहे.
अश्विनी चवरेनं या फोटोशूटसाठी एक हटके स्टाइल निवडली असून, तिच्या लूकमध्ये आत्मविश्वास, ग्लॅमर, आणि एक हटके व्यक्तिमत्व झळकत आहे.
हे फोटो तिच्या चाहत्यांना तिच्या व्यक्तिमत्वाचा नवीन पैलू दाखवतात, जो आतापर्यंत फार कमी लोकांनी पाहिला होता.