कधीकाळी अभिनेते, निर्माते फिरवायचे पाठ; अभिनेत्री एका सिनेमाने रातोरात बनली स्टार!

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी तिच्या लूकमुळे, तर कधी अभिनयामुळे हायलाइट होते.

श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय.

श्रद्धा कपूरचे आज लाखो चाहते आहेत. पण एक काळ असाही होता की निर्माते तिच्यासोबत काम करण्यास इच्छुक नसायचे.

श्रद्धाने तिच्या करिआरची सुरूवात 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'तीन पत्ती' चित्रपटामधून केली, पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.

श्रद्धा यानंतर ती 'लव्ह का द एंड' या चित्रपटामध्ये दिसली. तो चित्रपट देखील फ्लॉप ठरला.

सलग 2 फ्लॉप चित्रपटानंतर कोणालाच तिच्यासोबत काम करायचं नव्हतं, असं श्रद्धानं सांगितलं.

पण त्यानंतर 2013मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी 2' चित्रपटाने तिचे नशीब उजळलं.

यातील तिने साकारलेली आरोहीची भूमिका सर्वांनाच आवडली. यामुळे श्रद्धा रातोरात स्टार झाली.

VIEW ALL

Read Next Story