खोऱ्याने पैसा ओढणाऱ्या 'ओपेनहायमर'चं बजेट किती? ख्रिस्तोफर नोलन यांनीच केला खुलासा

या चित्रपटाची तिकीटं हजारो रुपयांना आहेत. पण हा चित्रपट बनवायला किती खर्च आला? जाणून घ्या...

'ओपेनहायमर' प्रदर्शित

हॉलिवूडमधील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या क्रिस्तोफर नोलन यांचा 'ओपेनहायमर' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.

तिकीटबारीवर चांगली कामगिरी

21 जुलै रोजी जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये 'ओपेनहायमर' प्रदर्शित झाला असून तिकीटबारीवर हा चित्रपट दमदार कामगिरी करत आहे.

रिव्ह्यूही फारच चांगले

सोशल मीडियावर ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपेनहायमर'चीच चर्चा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पहायला मिळतंय. या चित्रपटाचे रिव्ह्यूही फारच चांगले आहेत.

किती खर्च आला?

पण हजारो रुपये तिकीट असलेला ख्रिस्तोफर नोलन यांचा हा चित्रपट बनवण्यासाठी किती खर्च करण्यात आला आहे तुम्हाला ठाऊक आहे का?

जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर

'ओपेनहायमर' हा चित्रपट 'अणुबॉम्बचे जनक' अशी ओळख असलेले अमेरिकी शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

पुस्तकावर आधारित कथा

2005 साली प्रकाशित झालेल्या, 'अमेरिका प्रोमीथियस: द ट्रायम्फ अॅण्ड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपेनहायमर' या पुस्तकावर 'ओपेनहायमर' चित्रपटाचं कथानक आधारित आहे.

100 कोटी अमेरिकी डॉलर्सची चर्चा पण...

'ओपेनहायमर'चं बजेट 100 कोटी अमेरिकी डॉलर्स असल्याची चर्चा होती. म्हणजेच भारतीय चलनानुसार ही रक्कम 850 कोटी इतकी होते. मात्र हा दावा नोलन यांनीच खोडून काढला.

नोलन यांनीच इंग्लंडमध्ये दिली माहिती

मात्र आता ख्रिस्तोफर नोलन यांनीच या चित्रपटाचं नेमकं बजेट किती आहे याची माहिती दिली आहे. 'ओपेनहायमर'च्या लंडनमधील रिलीजदरम्यान नोलन यांनी ही माहिती दिली.

100 मिलियन डॉलर्सहून फार पुढे गेलं बजेट

चित्रपटाचं बजेट हे 100 मिलियन अमेरिकी डॉलर्सहून फार पुढे गेलं आहे, असं नोलन यांनी सांगितलं होतं.

'ओपेनहायमर'चं खरं बजेट किती?

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपेनहायमर' हा चित्रपट 180 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 1475 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आला आहे.

'आदिपुरुष'च्या दुप्पटीहून अधिक पैसा खर्च

म्हणजेच भारतातील सर्वात महागडा चित्रपट असलेल्या 'आदिपुरुष'च्या दुप्पटीहून अधिक पैसा खर्च करुन 'ओपेनहायमर' चित्रपट बनवला आहे. 'आदिपुरुष'चं बजेट 600 ते 650 कोटी होतं.

VIEW ALL

Read Next Story