तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या सोशल मीडिया इन्फ्युन्सर्समध्ये डॅनी पंडितचा समावेश होतो.
अस्सल पुणेकर असलेल्या डॅनी पंडितची लोकप्रियता प्रचंड असून त्याचे रिल्सही तुफान व्हायरल होतात.
मात्र सध्या डॅनी पंडित एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. हे कारण म्हणजे सर्वांच्या लाडक्या डॅनीने लग्न केलं आहे.
डॅनी पंडितनेच 'रिअल लाइफ अर्धांगिनी' अशा कॅप्शनसहीत लग्नचे फोटो शेअर केले आहेत.
डॅनीने नेहा कुलकर्णीबरोबर लग्न केलं आहे. फोटोत दोघेही फार सुंदर दिसत आहेत.
नेहाचं प्रोफाइल लॉक असून ती व्हीएफएक्स आर्टिस्ट असल्याचं तिच्या प्रोफाइलवरुन स्पष्ट होत आहे.
डॅनीचा जवळचा मित्र अर्थव सुदामेनेही इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लग्नातील फोटो पोस्ट करत अभिनंदन केलं आहे.
अनेक सेलिब्रिटींनी डॅनीच्या या पोस्टवर त्याचं अभिनंदन केलं आहे.