लेकीच्या आगमनानं रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण प्रचंड चर्चेत आले होते.
अशातच आता पुन्हा एकदा दोघे चर्चेत आले आहेत. कारण मुंबईतील फ्लॅट दीपिका रणवीर यांनी भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे.
रिअल इस्टेट कन्सलटन्ट स्वेअरच्या यार्डने एका निवेदनात याचा खुलासा केलाय.
दीपिका आणि रणवीरने मुंबईतील त्यांचे अपार्टमेंट दरमहिना 7 लाख रुपये भाड्याने दिले आहे.
मुंबईतील प्रभादेवी परिसरातील त्यांचे हे अपार्टमेंट आहे. हा परिसर सिद्धीविनायक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
रणवीरचे अपार्टमेंट 3245 चौरस फूट आणि 2319.50 चौरस फूट एवढे आहे.