बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात अनेक जोडप्यांचा घटस्फोट झाला आहे. यावरुन बॉलिवूडमध्ये ग्रे डिव्होर्स हा शब्द चर्चेत आला आहे.
वास्तविक ग्रे डिव्होर्स हा शब्द ग्रे केसांपासून आला आहे. याचा अर्थ केस सफेद होण्याच्या वयात घेतलेला घटस्फोट.
एखाद्या जोडप्याने 50 वर्षांच्या किंवा त्यापुढच्या वयात घटस्फोट घेतल्यास त्याला ग्रे डिव्होर्स असं म्हटलं जातं.
बॉलिवूडमध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खानने 19 वर्षांच्या संसारानंतर 2017 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं.
फरहान अख्तर आणि अनुधा अख्तर यांनी 16 वर्षांपर्यंत आपलं लग्नाचं नातं टिकवलं. यानंतर 2017 मध्ये त्यांना कायदेशीररित्या घटस्फोट घेतला.
अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया लग्नाच्या 21 वर्षांनंतर वेगळे झाले. त्यांनी 2019 मध्ये घटस्फोट घेतला.
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर सैफने करिना कपुरशी दुसरं लग्न केलं.
ऋतिक रोशन आणि सुजैन खानने लग्नाची 14 वर्ष नांत टिकवलं. 2014 मध्ये दोघांना सांमजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.