20 व्या वर्षी अभिनयाला सुरुवात

1991 मध्ये 20 व्या वर्षात अरविंद स्वामीने मणिरत्नम यांच्या थलापती चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरुवात केली.

Jul 10,2023

रोजा आणि बॉम्बे

त्यानंतर मणिरत्नम यांच्या रोजा आणि बॉम्बे या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात अरविंद स्वामीने काम केलं. या चित्रपटाने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं.

अरविंद स्वामीची भूरळ

रोजा आणि बॉम्बे चित्रटातील कथा आणि गाणी लोकांना प्रचंड आवडली. त्याचबरोबर अरविंद स्वामीच्या निरागस चेहऱ्यानेही लोकांनी भूरळ घातली.

चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच अरविंद स्वामीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला 1997 मध्ये अरविंद स्वामी आणि काजोलची भूमिका असलेल्या मिनसारा कनावू हा चित्रपट आला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला

जूही चावलाबरोबर अभिनय

यानंतर अरविंद स्वामीने सात रंग के सपने या चित्रपटात जूही चावलाबरोबर प्रमुख भूमिका साकारली.

रजनीकांतचा उत्तराधिकारी

त्यावेळी तामिळ चित्रपटसृष्टीत रजनीकांत आणि कमल हसन यांच्यानंतर अरविंद स्वामी याला त्यांचा उत्तराधिकारी मानलं गेलं.

अभिनयाला रामराम

पण 90 च्या दशकात त्याच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आणि 30 व्या वर्षीच त्याने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.

वडिलांच्या व्यवसायात लक्ष

त्याने आपल्या वडिलांच्या व्यवसायत लक्ष घातलं. त्यांची वी डी स्वामी कंपनी सांभाळत इंटरप्रो ग्लोबलमध्ये काम केलं.

कोट्यवधीचा टर्नओव्हर

त्यानंतर त्याने पेरोल प्रोसेसिंग आणि टॅलेंट मॅक्सिमस कंपनीची स्थापना केली. 2022 पर्यंत अरविंद स्वामीच्या कंपनीचा टर्नओव्हर 3300 इतका होता.

नेटफ्लिक्समधून पुनरागमन

2021 मध्ये नेटफ्लिक्ससाठी एका मालिकेसाठी त्याने दिग्दर्शन केलं. आता अरविंद स्वामीकडे तीन प्रोजेक्ट असून लवकरच तो चित्रपटातही दिसणार आहे

VIEW ALL

Read Next Story